Marathi
महाविद्यालयातील मराठी विभागाची स्थापना १९६९ मध्ये झाली असून, सुरुवातीला पदवी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था होती. सन १९९४ पासून मराठी विभागात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. मराठी विभागाचे ध्येय मराठी भाषा, संस्कृती विद्यार्थी आणि समाजापर्यंत पाहोचवणे आणि त्याविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणे आणि त्यांना तिची सखोल ओळख करून देणे हे आहे. मराठी विभागाचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्रादेशिक भाषांना असलेले महत्व पाहता विद्यार्थ्यांना भाषिक दृष्टीकोनातून अधिकाधिक कौशल्यपूर्ण शिक्षणाला प्राधान्यक्रम दिले जाईल. मराठी भाषा आणि साहित्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधींची माहिती करून देणे. त्यांना अप्रत्यक्षपणे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याला प्राधान्य असेल.